किती छान पडतो रात्रीचा पाउस... कधी शांत, कधी वादळी पण नेहमी मनस्वी...
एखाद्या मृगनयनीच्या डोळ्यांइतके काळे भोर आकाश... आणि त्यात क्षणार्धात लाखाक्णारे सूर्याचे ते तेज- आभाळाच्या शिरेवर सौदामिनीने रेखलेली ती क्षणिक चित्रे!
दूर कुठेतरी कोणाच्या मृदांगाला जीव आल्या सारखा नाद येत होता. इथे वार्यावर मृदागंधाचा श्वास जाणवत नाही पण कुठेतरी- माझ्या घरी अजूनही वार्यावर तेच अत्तर सांडत असेल ना?
आणि मग एका चापलचरणी युवती सारखी येणारी पावसाची सर! हा क्षण असाच राहावा ही जाणीव होण्या इतकी सुद्धा शुद्ध राहत नाही मनाला.
रस्त्यावर फुलांच्या पायघड्या पडल्या होत्या... आणि पावसाचा एक एक थेंब मल्हारचे सूर लावत होता - अगदी शांत हळुवारपणे उल्घडणाऱ्या गाण्याप्रमाणे- नव्हे! तुलनेत माणसाने गायलेली प्रत्येक नाझुक चीज देखील कानावर हिंसा केल्यासारखी वाटेल इतके शांत सौम्य ते त्या पावसाचे गाणे...
आणि अशा वेळी अगदी धुंद धुंद झालेली रात्र....
कोणासाठी हे सारे? कोणासाठी पडतो पाऊस असा.. कोणीही बघायला नसताना, सार्या इंद्रियांना जाग यावी आणि अनुभवावा असा सोहळा कोणासाठी?
स्वतःसाठीच असेल बहुदा... का माझ्यासाठी?
पाऊस कसा स्वतःसाठीच पडतो? .... रात्र कशी एकटीच धुंद होते...
ह्या पावसात कधीतरी एकटेच ओले चिंब भिजयाचय... पावसाच्या गाण्यात बेसूर होऊन साद द्यायची आहे...
पावसातल्या निलगिरीचा श्वास भरून घ्यायचाय...
एकदा परत कागदाच्या होड्या पाण्यात सोडायच्या आहेत...
एकदा परत ओल्या मातीच्या किल्ल्यामध्ये दिवाळीचे दिवे लावायचे आहेत...
एकदा रात्रीच्या ह्या हळुवार वार्यात स्वतःला विसरायचे आहे...
फक्त एकदा धुंद होऊन जगायचय...
Khoop chan, Aditya! Mala tuzya gacchitla drushya agadi dolya samor disala parat ekda. Of course there have been innumerable times when I have come to your place and it has started raining. But one thing you missed writing about is chaha. Paus padtana garam garam chaha ani bhaji khayla infinite maja yete na? Ratri tar ratri... ani ho, paus bhavtek swath: sathich padto. Rest all is its side effects! You waking up, the night getting a high, everything :)
ReplyDeleteLihit raha, maja ali vachun.
Thanks ashutosh :)
ReplyDeletechaha yes! but i was driving back home past midnight(the sorry flat in chennai we call home :D ) when it started raining so no tea just the endless rain...