त्या रत्नाकर तीरी...
हिरव्या झाडीत लपलेलं,
मिट्ट काळोखात दडलेलं,
रवी तेजात उजळलेलं,
काही गूढ आहे त्या रत्नाकर तीरी.
चारी प्रहरी धरती कडे झेपावणारा,
पैल तीरी गगन मिठीत विसावणारा,
कोणाच्या प्रेमात सुखावणारा,
कोणाच्या शोकात विरहिणी गाणारा,
आहे कोणी त्या रत्नाकर तीरी.
सप्त नद्या इथे विसावल्या,
चार युगं इथे उलटली,
सहस्त्र आदित्य इथेच तळपले,
नित्याची नक्षत्र इथेच कोसळली,
त्या तिथे त्या रत्नाकर तीरी.
ह्या इथे उभी आहे आजही सीता,
चिरंतर प्रेमाच्या वाचना पोटी,
ह्या इथे आहे तो,
शतजान्माचे गोफ धरुनी हाती,
त्या तिथे त्या रत्नाकर तीरी.
सुख-दुःखाचा तो भोगी,
का सहस्त्रालान्कारी वैरागी?
प्रती निमिशी जन्मलेला चिरंजीवी,
का स्थितप्रज्ञ हा कालचाक्राचा स्वामी?
No comments:
Post a Comment